Ticker

6/recent/ticker-posts

'पापा' नंबर असलेली गाडी दिसताच उत्तराखंड पोलिसांनी केले काही असे ! Car with 'Papa' number plate fined by Uttarakhand Police


उत्तराखंड पोलिसांना 4141 नंबर असणाऱ्या गाडीवर 'पापा' या डिजाईन ची नंबर प्लेट आढळली. अशा प्रकारच्या नंबर प्लेट बेकायदेशीर असल्या कारणाने उत्तराखंड पोलिसांनी या गाडीला फाईन मारत एक 'Before' आणि 'After' चा फोटो आपल्या ट्विटर हॅण्डल द्वारे प्रदर्शित केला आहे.


फोटो सोबत उत्तराखंड पोलिसांकडून एक शायरी सुद्धा शेयर करण्यात आली. ज्या मध्ये अशी फॅन्सी नंबर प्लेट लावणे कसे बेकायदेशीर आहे हे सांगण्यात आले आहे. उत्तराखंड पोलिसांनुसार एका ट्विट द्वारे त्यांना या गोष्टी ची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच कार मालकाला RTO ऑफिस ला बोलावून चालान केले गेले वर नंबर प्लेट बदलण्यात आली.

मोटर वेहिकले ऍक्ट 1989 च्या अंतर्गत हे निश्चित केले आहे कि दुचाकी वर चार चाकी वाहनांसाठी पांढऱ्या नंबर प्लेट वर काळ्या अक्षरात नंबर लिहिणे आवश्यक आहे त्याच प्रमाणे commercial अर्थात व्यावसायिक वाहनांसाठी पिवळ्या नंबर प्लेट वर काळ्या अक्षरांनी नंबर टाकणे आवश्यक आहे.

याच ऍक्ट अंतर्गत फॅन्सी नंबर प्लेट लावणे किंवा नंबर प्लेट वर चित्र लावणे बेकायदेशीर आहे आणि या साठी गाडी मालकाला चालान केले जाऊ शकते.

Post a Comment

0 Comments